swt1912.jpg
31982
परेल ः भारत म्हाडगुत यांचा सत्कार करताना मान्यवर.
गाडगे महाराज ट्रस्टतर्फे
म्हाडगुत यांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ ः शिवसेना पक्षाचे पहिले आमदार व खासदार (कै.) वामनराव महाडिक यांच्या जन्मशताब्दी सांगता समारंभानिमित्त परेल येथील श्री संत गाडगे महाराज ट्रस्ट यांच्या वतीने उपविभाग प्रमुख भारत म्हाडगुत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष प्रा. हेमंत सामंत, घनःश्याम कडूसकर, वामनराव महाडिक यांच्या कन्या डॉ. चित्रा ठाकूर, राधा कडुसकर, श्रद्धा भस्मे उपस्थित होते.
सर्व उपस्थितांनी वामनरावांच्या आठवणींना उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका आदर्श शिक्षकाला याच दिवशी त्यांच्या तळेरे येथील शाळेत पुरस्कार देऊन गौरवले जाते, अशी माहिती डॉ. ठाकूर यांनी दिली. कार्यक्रमाला एआय तज्ज्ञ स्वप्नेश माळी, अभिनेत्या संध्या म्हापणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मशाळेचे विश्वस्त प्रमोद सावंत यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.