-rat१९p९.Jpg-
P२६O३१९४१
चिपळूण ः शहरातील कपड्यांच्या दुकानामध्ये रमजान ईदच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
-------
रमजान ईदची आतुरता शिगेला
चिपळूण बाजारपेठेत गर्दी ; सुका मेवा खरेदी जोरात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः अवघ्या दोन दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत कपड्यांसह अन्य पदार्थ आणि वस्तू खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी होत आहे. विशेषतः शिरखुर्म्यासाठी सुकामेव्याची मागणी वाढली आहे. चिपळूण परिसरात नमाज अदा करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मुस्लिम मोहल्यांमध्ये रमजान ईदची आतुरता शिगेला पोहोचली आहे.
यावर्षी रमजान ईद २१ मार्चला साजरी होणार आहे. नुकतेच शब-ए- कद्र भक्तीभावाने साजरी करण्यात आली. याच पवित्र रात्री कुरआन अवतरले, अशी मुस्लीम बांधवांची श्रद्धा आहे. त्याच्या स्मरणार्थ मुस्लिम बांधवांनी रमजानाच्या सुरुवातीपासून तरावीहच्या नमाजमध्ये कुरआन पठण केले. शब-ए- कद्रच्या रात्री सामुहिक प्रार्थना करण्यात आली. त्यात मानवतेच्या मार्गाने चालण्याचीही प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी सुरू झाली. ईदच्या निमित्ताने विविध प्रकारचे कापड, टोप्या, सुट, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मुला-मुलींचे कपडे, बंगड्या, शिरखुर्म्यासाठी सुकामेवा, रंगीत शेवया यासह पठणी ड्रेस, देशी, विदेशातील खाद्यपदार्थ, खजूर आदींना मागणी वाढली आहे.
-----
गरीब कुटुंबीयांना मदत
मुस्लिम समाज बांधवांसाठी रमजान महिना म्हणजे दानधर्माला अधिक प्राधान्य देणारा असतो. उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम जकात म्हणून गरिबांना देवून आर्थिक सहकार्य केले जाते. तसेच या पर्वात गरिबांना कपडे, अन्नधान्य दिले जाते. विशेष म्हणजे दानधर्म करत असताना त्याची गुप्तता पाळली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.