कोकण

देवगड किनाऱ्यावर पावसाचे सावट

CD

देवगड किनाऱ्यावर पावसाचे सावट
ढगाळ वातावरण ः आंबा बागायतदारांच्या चिंतेत भर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः तालुक्याच्या किनारी भागात पावसाचे सावट आहे. अधूनमधून आकाश काळवंडून येऊन पावसाची लक्षणे दिसतात; मात्र पाऊस कोसळत नाही. वातावरणातही सकाळच्यावेळी धुके पसरलेले असते. दरम्यान, वादळी वाऱ्यासह किनारी भागात पाऊस झाल्यास आंबा पिकास नुकसानीचे ठरू शकते.
राज्याच्या विविध भागांत अवकाळी पाऊस झाला. काही भागात गारपीठही झाली. याच पार्श्‍वभूमीवर तालुक्याच्या किनारी भागात ढग जमा होऊ लागले होते. आकाश ढगाळ होत असल्याने पाऊस कोसळण्याची लक्षणे मानली जात होती; मात्र पाऊस झालेला नाही. पहाटेच्यावेळी अजूनही धुके पसरत असल्याने किनारी भागात विचित्र हवामानाचा अनुभव सध्या स्थानिक घेत आहेत.
यंदा हापूसचे अल्प पीक असल्याचे सांगितले जाते. बदलत्या हवामानाचा तसेच अनियंत्रित किडरोगाचा प्रादुर्भाव आंबा पिकाला जाणवला. त्यामुळे संभाव्य उत्पादन घटीची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यातच वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्यास आंबा पिकाला मारक ठरू शकतो. आता काही झाडांवर आंबा फळे तयार होऊ लागली आहेत. अशावेळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास वार्‍याने फळांचे देठ तुटू शकतात. त्यामुळे लांब देठ असलेली फळे पडून नुकसान होण्याची शक्यता असते. सध्या दिवसभर वातावरण कोरडे असते; मात्र सकाळी आणि सायंकाळच्यावेळी ढगाळ वातावरण तयार होत असते. त्यातच पाऊस होण्याच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT