मुंबई-गोवा चौपदरीकरणाचा
रस्त्यालगतच्या घरांना फटका
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १९ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर ते माभळेदरम्यान सुरू असलेल्या चौपदरीकरणामुळे माभळे गावातील नागरिक सध्या भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. रस्ता रुंदीकरणादरम्यान करण्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील उत्खननामुळे गावातील काही घरांना तडे गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या मार्गाचे येथील काम तब्बल १७ वर्षे रखडले होते. सोनवी पुलासह रखडलेली कामे आता वेगाने सुरू झाली असली तरी कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गणेश हॉटेल ते पुनर्वसन परिसरादरम्यान डोंगर उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्याचा थेट परिणाम स्थानिकांच्या घरांवर होत असल्याचे दिसून येत आहे. डॉ. हर्षदा डिंगणकर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई करण्यात येत असून, ही खोदाई निर्धारित हद्दीबाहेर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत. तसेच उज्ज्वला खापरे आणि घडशी कुटुंबीयांच्या घरांकडे जाणारा मार्गही बंद झाल्याची तक्रार असून त्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळालेला नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डोंगर कापल्यामुळे पुढील बाजूची जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्या चार ते पाच घरांना गंभीर धोका निर्माण झाला असून, उत्खनन करताना जमिनीच्या आत खोलवर माती काढली जात आहे. दरम्यान, स्थानिकांनी प्रशासन आणि ठेकेदार कंपनीकडे तातडीने संरक्षण भिंत उभारणे, सुरक्षित पद्धतीने उत्खनन करणे, बाधितांना योग्य मोबदला देणे आणि सीमारेषा स्पष्ट करणे यांसारख्या मागण्या केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.