कोकण

-शिक्षिकेची बदली न केल्यास आजपासून शाळा बंद

CD

शिक्षिकेची बदली न केल्यास शाळा बंद
टेरव ग्रामपंचायतीचा ठराव ; तक्रारींबाबत कार्यवाही करण्यात टाळाटाळ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ ः तालुक्यातील टेरव येथील जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षिकेच्या कामकाजावरून पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ वैतागले आहेत. शाळेचे शैक्षणिक कामकाज योग्यरीत्या न करणे अशा विविध तक्रारी पालकांनी केल्या आहेत. संबंधित शिक्षिकेची बदली करावी अन्यथा २० मार्चपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा ठराव टेरव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला.
टेरवमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. एक येथे विद्यार्थ्यांची पटसंख्या १३५ आहे. डिसेंबर २०२३ पासून या शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षिकेबाबत पालकांच्या तक्रारी आहेत. त्यांच्याबाबत पंचायत समितीकडेही वारंवार तक्रारी झाल्या आहेत; मात्र त्यावर कारवाई झालेली नाही. शाळेत नियमित वेळेत येण्याची शिस्त नाही. कोणाला माहिती न देताच रजेवर जाणे, शाळेचे शैक्षणिक कामकाज योग्यरीत्या न करणे अशा विविध तक्रारी पालकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. यापुढे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली. संबंधित शिक्षिकेच्या भूमिकेला काही वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देत आहेत. त्यामुळे १८ मार्चला झालेल्या टेरव ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत याविषयी जोरदार चर्चा करण्यात आली. संबंधित शिक्षिका यांची त्वरित बदली करावी तसेच रिक्त असलेले मुख्याध्यापक पद भरावे अन्यथा २० मार्चपासून शाळा बंद आंदोलन करण्याचा ठराव करण्यात आला. ग्रामपंचायतीने केलेला ठराव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे देण्यात आला आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे पालकांचे तसेच ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.
----
कोट
पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद शाळा नंबर एक मधील संबंधित शिक्षिकेबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी ग्रामपंचायतीकडे आल्या आहेत. गेल्या दोन वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. त्यांना कितीही सूचना केल्या तरी त्याचा काडीचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे या शिक्षिकेची बदली करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे या हेतूने पालकांनी आणि ग्रामपंचायतीने त्यांची बदली करावी, अशी मागणी केली आहे.
- किशोर कदम, सरपंच, टेरव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Solapur News : माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT