कोकण

वेंगुर्लेत २८ पासून हनुमान जन्मोत्सव

CD

वेंगुर्लेत २८ पासून
हनुमान जन्मोत्सव
वेंगुर्ले ः श्री हनुमान मंदिर सेवा न्यास, वेंगुर्लेतर्फे मारुती स्टॉप येथील श्री देव हनुमान मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्री हनुमान जन्मोत्सव २८ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत साजरा होत आहे. त्यानिमित्त २८ मार्चला सायंकाळी ७ वाजता कलावैभव महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, देवबाग यांचा ‘मुंगुस सर्प संग्राम’ अर्थात ‘नकुला देवी’ हा नाट्यप्रयोग, २९ ला सायंकाळी ७ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ, खानोली यांचा ‘दक्ष उत्पत्ती’ नाट्यप्रयोग, ३० ला सायंकाळी ७ वाजता बावळेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली यांचा ‘भ्रुगंश्री अवतार’ हा नाट्यप्रयोग, ३१ ला सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, दाभोली यांचा ‘मार्जार’, १ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता रामेश्वर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा ‘रूई माहात्म्य’ हा नाट्यप्रयोग होईल. तसेच २ एप्रिलला पहाटे ४.३० वाजता श्री मारुतीला अभिषेक व पूजा, पहाटे ५ वाजता डॉ. रमेश पाटकर (माणगाव) यांचे कीर्तन, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, पुष्पवृष्टी, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसाद, ७ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा ‘गोमय वज्रांगधारी’ हा नाट्यप्रयोग होईल.
--
‘गुरुकुल प्रज्ञाशोध’मध्ये
पिकुळे केंद्रशाळेचे यश
दोडामार्ग ः पिकुळे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांनी गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश प्राप्त केले. पहिलीतील विद्यार्थी राज गवस याने जिल्ह्यात पाचवा, तर राज्यात दहावा क्रमांक मिळविला. याच वर्गातील कृष्णा सावंत याने जिल्ह्यात दहावा व राज्यात १५ वा, तर अन्वी गवस हिने तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला. दुसरीतील रुद्र सावंत याने जिल्ह्यात नववा, तर राज्यात १४ वा क्रमांक मिळवत शाळेची यशोकीर्ती वाढविली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका प्राची गवस तसेच शिक्षक राकेश कर्पे यांचे मार्गदर्शन लाभले. या उज्ज्वल यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
...................
‘जीटीएस’ परीक्षेत
शौर्या सावंतचे यश
दोडामार्ग ः गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षा (जीटीएस) २०२५-२६ मध्ये तालुक्यातील सरगवे गावची कन्या सासोली-हेदुस येथील विद्यार्थिनी शौर्या सावंत हिने उल्लेखनीय यश प्राप्त केले. दुसरीत शिक्षण घेत असलेल्या शौर्याने या परीक्षेत १०० पैकी ७४ गुण (७४ टक्के) मिळवत सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर नववा आणि महाराष्ट्र राज्यस्तरावर १४ वा क्रमांक पटकावला. शौर्या ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सासोली-हेदूस येथील विद्यार्थिनी असून, या यशाचे श्रेय आई जान्हवी सावंत, वडील भूषण आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनास दिले आहे. या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी शौर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
---
तेंडोलीत मंगळवारी
वर्धापन दिन सोहळा
कुडाळ ः तेंडोली येथील श्री देव न्हाणीचा होळकर (शिमधडा) देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी (ता. २४) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ९.३० वाजता उत्सवमूर्तीला श्रीफळ, विडा ठेवून गाऱ्हाणे, श्री गणेश पूजन, १० वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वाजता नैवेद्य, आरती, गाऱ्हाणे, तीर्थप्रसाद, सायंकाळी ४ वाजता ग्रामस्थांची भजने, आरती, ७.३० वाजता आरोलकर दशावतार मंडळ, आरवली-वेंगुर्लेचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव न्हाणीचा होळकर सेवा मंडळ, तेंडोलीच्यावतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: मोठी बातमी! अशोक खरातचं बिंग फोडणारा निरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; खरातच्या संपत्तीची माहिती आली समोर

Dhule Election : धुळे जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा! ४७ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान

Thane News: ठाणे एसटी आगारात मोठा बदल होणार, प्रवाशांना दिलासा मिळणार, प्रशासनाने उचलले महत्तवाचे पाऊल

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

SCROLL FOR NEXT