कोकण

राजापूर - डॉ. नाटेकर यांच्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन

CD

rat20p15.jpg -
32173
राजापूर ः डॉ. प्रतीक नाटेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना आमदार किरण सामंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर, शिवसेनेचे अशफाक हाजू आणि मान्यवर.

डॉ. नाटेकर यांच्या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन
आमदार सामंतांची उपस्थिती; औषधनिर्मिती क्षेत्राला नवी दिशा
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २० ः पर्यावरण संरक्षण आणि औषधनिर्मिती क्षेत्राला नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण संशोधन करणारे राजापूरचे डॉ. प्रतीक नाटेकर यांच्या नवीन पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. आमदार किरण सामंत यांच्या हस्ते राजापूर येथील शासकीय विश्रामगृहात हा कार्यक्रम झाला.
डॉ. नाटेकर यांनी या पुस्तकातून मानव आणि वनस्पती यांच्यातील आदिम नातेसंबंधांचे सखोल विश्लेषण केले आहे. यामध्ये विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील पारंपरिक ज्ञानाचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण केले आहे. तसेच वनस्पतींचा मानवी आरोग्यासाठी औषधी आणि आहारातील उपयोग, पर्यावरणरक्षण आणि निसर्गाचा शाश्वत विकास यावर मार्गदर्शन करण्यात आले आहे. केवळ पुस्तकच नव्हे, तर डॉ. नाटेकर यांनी औषधी वनस्पतींमधील सक्रिय घटक ओळखण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एका विशेष उपकरणाचे डिझाईन विकसित केले आहे. या उपकरणाला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले असून, हे संशोधन वनस्पतीशास्त्र आणि औषधनिर्मिती क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरणार आहे.
या सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, राजापूर पंचायत समितीचे पक्षप्रतोद प्रसाद मोहरकर, प्रा. शैलेंद्र प्रभुदेसाई, डॉ. बाबू सोनार, प्रा. अतुल टिके, प्रा. प्रकाश कोंडसकर, प्रा. ऋषिकेश आचार्य आणि अतिश नाटेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. नाटेकर सध्या रयत शिक्षणसंस्थेच्या विखारेगोठणे येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल (पेटंट आणि पुस्तक प्रकाशन) संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया आता होणार अधिक स्मार्ट! गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; मेगा प्लॅन काय?

Manchar News : ‘पाणी नको, सिलिंग हटवा’चा नारा; आंबेगावात शेतकऱ्यांची एकजूट, न्यायालयीन लढ्याचा निर्धार

स्वामी भक्तांना अनोखी भेट; श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रदर्शित

YIN Elections : ‘यिन’ निवडणुकीचा जल्लोष! तरुणाईचा उत्साह, गुलालाची उधळण, दुचाकी रॅली; विजयानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT