rat20p13.jpg ः
32171
चिपळूण ः उद्यानाची पाहणी करताना नगराध्यक्ष उमेश सकपाळ व नगरसेवक.
-------
पाग उद्यानाच्या दुरवस्थेप्रश्नी
चिपळूणात अधिकारी धारेवर
असुविधेवरून नागरिकांत तीव्र नाराजी
चिपळूण, ता. २० ः शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या पाग येथील उद्यानाची दुरवस्था झाली असून, उद्यानातील अस्वच्छता, बंद स्वच्छतागृह, वाढलेले गवत आणि अपुऱ्या सुविधा याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. गेले अनेक दिवस पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले होते. उद्यानातील दुरवस्थेची दखल नगराध्यक्षपद स्वीकारल्यानंतर उमेश सकपाळ यांनी घेतली. त्यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत परिसरातील उद्याने स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नगराध्यक्ष सकपाळ यांनी पाग येथील उद्यानाची पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी इथे स्वच्छता असते का, असा प्रश्न विचारला. तेव्हा नागरिकांनी नकारार्थी उत्तर दिले. तसेच उद्यानात वीज नसल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी वीज उपलब्ध करून देण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी केल्या. तसे झाले तर सायंकाळी होणारे गैरप्रकार रोखता येतील, असे त्यांनी मत व्यक्त केले. उद्यानातील पेव्हरब्लॉक दुरूस्त करण्याचे, उद्यानाचे दोन्ही गेट सुरू ठेवण्याचे आणि इतर अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्याचे निर्देशही त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छतागृहाची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश देताना उद्यान विभागप्रमुख बापू साडविलकर यांना दूरवस्थेबाबत सुनावले. आरोग्य सभापती शुभम पिसे यांनीही आरोग्य व उद्यान विभागाला आवश्यक त्या सूचना केल्या.
या वेळी आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका शीतल रानडे, शिवसेना उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, माजी नगरसेविका सई चव्हाण तसेच विपुल कांबळी, नयन चव्हाण, संदेश गोरीवले, गणेश किंजळकर, प्रसाद शिंदे आदी उपस्थित होते.
कोट
उद्यान परिसर स्वच्छ ठेवा, नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्या तसेच उद्यान सकाळी व सायंकाळी नियमित सुरू ठेवा. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करा, मी आठ दिवसांनंतर पुन्हा पाहणी करणार आहे.
- उमेश सकपाळ, नगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.