कोकण

दापोली -नोकरीसोबत एकात्मिक शेतीचा गव्हेत यशस्वी प्रयोग

CD

काही सुखद---लोगो

rat20p18.jpg-
32177
दापोली ः गव्हे येथील केळी पिकाची पाहणी करताना कृषी विभागाचे अधिकारी.
------------
नोकरीसोबत एकात्मिक शेतीचा यशस्वी प्रयोग
गव्हेतील सतीश पुळेकरांचा पुढाकार; शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण
राधेश लिंगायत ः सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २१ : कोकणातील पारंपरिक शेतीपद्धतीत बदल घडवून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीही शाश्वत आणि फायदेशीर व्यवसाय ठरू शकते, हे दापोली तालुक्यातील गव्हे गावचे शेतकरी सतीश पुळेकर यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत एकात्मिक शेतीपद्धतीचा अवलंब करून त्यांनी शेतीत लक्षणीय परिवर्तन घडवून आणले असून, आज ते परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण बनले आहेत.
मान्सून हंगामात भात, नाचणी आणि वरीची पारंपरिक लागवड करणारे पुळेकर वर्षभर शेती उत्पादन सुरू राहील, यासाठी हिवाळा ते उन्हाळा या कालावधीत विविध भाजीपाला पिकांकडे वळले. कारली, पडवळ, कलिंगड, मिरची, वांगी, चवळी, केळी, काकडी, भेंडी, घोसाळी, भोपळा, फरसबी तसेच विविध पालेभाज्यांचे उत्पादन ते सुमारे दीड एकर क्षेत्रात घेतात. याशिवाय एका एकरात आंबा व काजूची बागही त्यांनी विकसित केली आहे.
जालगाव सहकारी सोसायटीमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत असतानाही पुळेकर यांनी शेतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. सात सदस्यांच्या एकत्र कुटुंबाचे मिळालेले पाठबळ हे त्यांच्या यशामागील महत्त्वाचे बळ ठरले आहे. आधुनिक सिंचन तंत्रज्ञानाचा स्वीकार हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. ठिबक व तुषार सिंचन प्रणाली, सेंद्रिय खतांचा वापर आणि पर्यावरणपूरक शेतीपद्धती यामुळे त्यांनी उत्पादनक्षमता वाढवतानाच खर्चातही बचत साधली आहे. कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रिय उपाययोजनांना प्राधान्य देत त्यांनी नैसर्गिक संतुलन जपणारी शेती विकसित केली आहे. यांत्रिकीकरणामुळे श्रम व वेळेची बचत होऊन शेतीकाम अधिक कार्यक्षम झाले आहे.
कृषी विभागाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेत त्यांनी आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून घेतली. राष्ट्रीय नैसर्गिक शेती योजनेअंतर्गत जीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, गांडूळखत आणि निंबोळी अर्कसारख्या निविष्ठा स्वतः तयार करून उत्पादन खर्च लक्षणीयरित्या कमी केला आहे. तसेच तालुका कृषी अधिकारी हेमंत ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी मंचरे, उपकृषी अधिकारी वैदेही गुहागरकर आणि सहाय्यक कृषी अधिकारी दर्शना वरवडेकर यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट
सुमारे ३० हजाराचे उत्पन्न
पिकवलेला ताजा भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी वेगळाच मार्ग निवडला आहे. स्वतः टोपलीत भाजीपाला घेऊन ते जालगाव परिसरात फिरून विक्री करतात. ताजेपणा आणि गुणवत्तेमुळे त्यांच्या भाजीपाल्याला मोठी मागणी असून, अनेकदा उत्पादन अपुरे पडते. कलिंगडाची विक्री ते स्वतंत्र स्टॉलद्वारे करतात. या उपक्रमातून त्यांना महिन्याला सुमारे २५ ते ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

कोट
एकात्मिक शेतीपद्धतीमुळे शेती हा केवळ पारंपरिक व्यवसाय न राहता शाश्वत आणि उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो. यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन होते. भविष्यात उत्पादन वाढवण्याचा आणि शेती अधिक विस्तारण्याचा मानस आहे.
- सतीश पुळेकर, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: मोठी बातमी! अशोक खरातचं बिंग फोडणारा निरज जाधव पोलिसांच्या ताब्यात; खरातच्या संपत्तीची माहिती आली समोर

Dhule Election : धुळे जिल्ह्यात निवडणुकीचा धुरळा! ४७ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान

Thane News: ठाणे एसटी आगारात मोठा बदल होणार, प्रवाशांना दिलासा मिळणार, प्रशासनाने उचलले महत्तवाचे पाऊल

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

SCROLL FOR NEXT