32211
‘अक्षरोत्सव’ प्रदर्शनाला
तळेरेत उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २० : येथील जिल्हा परिषद आदर्श पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत आयोजित ‘तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध संदेश पत्र संग्राहक, ‘अक्षरोत्सव’ प्रमुख निकेत पावसकर उपस्थित होते.
आयुष्यावर मनापासून प्रेम करायचे असेल, तर प्रत्येकाने एखादा तरी छंद जोपासून तो यशस्वी करण्यासाठी सातत्य आणि प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पावसकर यांच्या ‘अक्षरोत्सव’ या संदेश पत्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच हनुमंत तळेकर यांच्या हस्ते फीत कापून, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अनुष्का गोसावी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपसरपंच संदीप घाडी, तळेरे तंटामुक्त समिती अध्यक्ष नीलेश सोरप, शशांक तळेकर, शरद वायंगणकर, नीलेश तळेकर, मुख्याध्यापक महेंद्र पावसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, पालक आणि शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. शोभा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. या अनोख्या संग्रहाचे उपस्थितांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.