कोकण

चिपळूण-भास्कर जाधवांच्या सल्ल्याने सामंत गहिवरले

CD

32417

भास्कर जाधवांच्या सल्ल्याने सामंत गहिवरले
चिपळूण अर्बनचा कार्यक्रम; विमानातून जाताना काळजी घेण्याचा सल्ला
चिपळूण, ता. २१ः राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत आणि शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यातील एका भावनिक प्रसंगाने श्रोत्यांनी वाहवा मिळवली. निमित्त होते चिपळूण अर्बन बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. या कार्यक्रमात राजकीय मतभेद विसरून या दोन्ही नेत्यांमधील कोकणी नमुना आणि दिलदारपणा पाहायला मिळाला.
पुढील कार्यक्रमासाठी तातडीने निघायचे असल्याची बाब पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कानावर घातली. त्यावर जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी होती. दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताची आठवण करून देत जाधव म्हणाले, ‘‘तू कायम विमानाने आणि हेलिकॉप्टरने फिरतोस. स्वतःची काळजी घे, विमान कंपनीची नीट चौकशी कर. तुझ्यासारख्या नेतृत्वाची महाराष्ट्राला गरज आहे.’’ एका राजकीय विरोधकाच्या तोंडून आलेले हे काळजीपोटीचे शब्द ऐकून मंत्री सामंतही भावूक झाले. आपल्या भाषणात या प्रसंगाचा उल्लेख करताना मंत्री सामंत म्हणाले, ‘‘कोकणातील लोकप्रतिनिधींच्या मनात किती माणुसकी असते, हे आज भास्कर जाधव यांनी दाखवून दिले. राजकारणात आमचे संघर्ष कितीही असले, तरी आपल्या जिल्ह्यात असा दिलदार विरोधक आहे, याचे मला मोठे समाधान आहे.’’

चौकट
मतभेद बाजूला ठेवून सर्व एकवटले
या सोहळ्याच्या नियोजनावेळी दोन्ही नेते एकत्र येतील का, अशी साशंकता आयोजकांमध्ये होती; मात्र, मंत्री सामंत यांनी स्वतः पुढाकार घेऊन आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम या सोहळ्याला हवेच, अशी भूमिका घेतली होती. राजकीय मतभेद बाजूला ठेवून विकासासाठी आणि माणुसकीसाठी आम्ही सर्व एकत्र आहोत, असाच संदेश या निमित्ताने त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT