Yuzvendra Chahal’s alleged vaping video from inside an aircraft goes viral
esakal
Why Yuzvendra Chahal video is trending on social media: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ( Riyan Parag) याचा व्हॅपिंग करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली होती. BCCI वर जोरदार टीका झाली आणि रियानवर दंडात्मक कारवाईही झाली. हे प्रकरण ताजे असताना आता, पंजाब किंग्सचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल वादात सापडला आहे. संघाच्या ट्रॅव्हल व्लॉगमधील एक कथित क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे आणि ज्यामध्ये तो संघासोबत प्रवास करत असताना विमानात व्हॅपिंग करताना दिसत आहे.