कोकण

आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रीडासंकूल ६ महिन्यात पूर्ण

CD

rat20p27.jpg
32243
रत्नागिरी- जिल्हा क्रीडासंकूल कार्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार.
rat20p28.jpg-
32244
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावपटूंसाठी तयार होत असलेला ट्रॅक.
---------------
आंतरराष्ट्रीय क्रीडासंकूल सहा महिन्यात पूर्णत्वास
मिरजोळे येथे २३ कोटीचा प्रकल्प ; कामाला गती, २ टप्प्यात १८ कोटी खर्च
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : मिरजोळे एमआयडीसीत भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे ''जिल्हा क्रीडासंकूल'' उभे राहत आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाने आता वेग घेतला आहे. सुमारे २३ कोटींच्या या क्रीडासंकुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या सहा महिन्यांत खेळाडूंच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पाठपुराव्यामुळे रखडलेल्या या कामाला गती मिळाली आहे. क्रीडांगणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
जिल्हा क्रीडासंकूल या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या कामाचे नियोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ७ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीतून जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल आणि क्रीडा कार्यालयाची उभारणी आधीच पूर्ण झाली आहे तसेच जिम्नेशियम आणि बास्केटबॉल कोर्टची कामेही प्रगतीपथावर आहेत. आता दुसऱ्या टप्प्यात १५ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून क्रीडासंकुलाचा चेहरामोहरा बदलणारी कामे केली जात आहेत. ​या संकुलाचे मुख्य आकर्षण म्हणजे ८ कोटी ४५ लाख रुपये खर्चून तयार करण्यात येणारा ४०० मीटरचा ‘सिंथेटिक ट्रॅक’ हा आहे. या ट्रॅकमुळे रत्नागिरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
सध्या या ट्रॅकसाठी आवश्यक असणारे सपाटीकरणाचे काम पूर्ण झाले असून, लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. याशिवाय ३ कोटी ६८ लाख रुपये खर्चून एक भव्य बहुउद्देशीय सभागृह उभारले जात आहे. या हॉलमध्ये खो-खो, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉलसारख्या विविध ३९ खेळांच्या स्पर्धा एकाच छताखाली घेता येतील.
२०१४ मध्ये याचे भूमीपूजन झाले होते. सुरवातीला कामाला गती मिळाली; मात्र मधल्या काळात काही तांत्रिक कारणांमुळे हे काम रखडले होते. गेल्या दोन वर्षांत मात्र युद्धपातळीवर प्रयत्न करून प्रशासनाने या कामाला पुन्हा वेग दिला आहे. आतापर्यंत सुमारे १८ कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे.

चौकट
११ एकरमध्ये विस्तीर्ण क्रीडांगण
जिल्हा क्रीडासंकूल ११ एकरच्या विस्तीर्ण जागेवर पसरलेले आहे. संकुल पूर्ण झाल्यावर कोकणातील खेळाडूंना सरावासाठी उत्तम व्यासपीठ मिळणार आहे. संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते आणि सुरक्षा केबिनची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. डिसेंबरमध्ये हे संकूल पूर्ण झाल्यावर रत्नागिरीच्या क्रीडाक्षेत्राचा मोठा विकास होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT