कोकण

जल्लोष भारी, शोभायात्रा ठरली न्यारी

CD

32363
तळेरे ः हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी काढलेली शोभायात्रा.

जल्लोष भारी, शोभायात्रा ठरली न्यारी

कासार्डे, तळेरे पंचक्रोशी; हिंदू नववर्षाचे उत्साहाने स्वागत

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २१ : गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून कासार्डे व तळेरे पंचक्रोशीतील नागरिकांनी संयुक्त ‘नववर्ष स्वागत शोभायात्रा’ गुरुवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात काढली.
या यात्रेचे हे चौथे वर्ष असून, कासार्डे तिठा येथून निघालेली ही यात्रा तळेरे एसटी स्थानकापर्यंत गेली. तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.तत्पूर्वी कासार्डे तिठा येथे मुली व पुरुषांनी लाठीकाठी व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा असलेला चित्ररथ आणि भगवा धर्मध्वज अग्रभागी होता. सोबतीला बैलगाडी, स्वामी समर्थ, विठ्ठल, शंकर व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले होती. पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या महिला व पुरुषांनी जयघोष करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा, तर महिलांनी नऊवारी साड्या परिधान करून हातात गुढी व ध्वज घेतले होते. शोभायात्रेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कासार्डे-तळेरे पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि आबालवृद्ध ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तळेरे बसस्थानक येथे डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी शुभेच्छा देऊन हिंदू नववर्षाबाबत मनोगत व्यक्त केले. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT