rat21p8.jpg-
32374
रत्नागिरी : पोमेंडी बुद्रुक, कारवांचीवाडी ग्रामपंचायतीमध्ये आयोजित स्पर्धेत पैठणीचा मान जागृती मयेकर यांना प्रदान करताना सरपंच ममता जोशी. सोबत मंदार नैकर, अमेय वीरकर आदी.
---------
जागृती मयेकर यांनी पटकावली पैठणी
पोमेंडी बुद्रुक ग्रामपंचायत; महिला दिनानिमित्त कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानअंतर्गत ग्रुपग्रामपंचायत पोमेंडी बुद्रुक कारवांचीवाडी कार्यक्षेत्रामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शंकर पार्वती मंगल कार्यालयात करण्यात आले. पैठणीचा मान जागृती मयेकर यांना मिळाला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. बांधकाम कामगार योजनेंतर्गत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी सरपंच ममता जोशी, उपसरपंच राजेंद्र कांबळे तसेच सदस्य दिगंबर मयेकर, रमेश घाणेकर, सायली बाणे, राजेंद्र कदम, विजया कांबळे, नलिनी कांबळे, विशाल भारती, प्रांजल खानविलकर, रेश्मा कांबळे, प्राजक्ता जोशी उपस्थित होत्या.
या वेळी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे, पोलिसपाटील स्वाती जाधव व समीक्षा शिंदे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे तालुकाप्रमुख मंदार नैकर, बंटी महाकाळ आणि ४५० महिलाभगिनी उपस्थित होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.