कोकण

पाटगावात जलसंवर्धनाचा संदेश

CD

32392

पाटगावात जलसंवर्धनाचा संदेश

‘जल महोत्सव’ उत्साहात; विविध उपक्रमांत ग्रामस्थांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा 
देवगड, ता. २१ : पाटगाव (ता. देवगड) ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित करण्यात आलेला ‘जल महोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यामध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग होता. जलसंवर्धन, पाणी बचत आणि स्वच्छ पाणीपुरवठ्याबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
महोत्सवाचे उद्‍घाटन पंचायत समिती सदस्य सादिक डोंगरकर व सरपंच नीतेश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. प्रभारी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यात आली. महोत्सवात जलदिंडी काढून जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.
विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर व शाखा अभियंता संदीप पोवार यांनी जल व्यवस्थापन, पाणीपुरवठा योजना आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. गावात शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था उभारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगण्यात आल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ग्रामपंचायत अधिकारी रुमा फड, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच शालेय समितीने सहकार्य केले. या कार्यक्रमात दीपक गुरव, श्रद्धा गुरव, रविकांत गुरव, जितेंद्र सावंत, सुहास गुरव, एकनाथ बाणे, सखाराम बाणे, प्रदीप गुरव , प्रकाश गुरव, अर्चना गुरव, विजया हातगे, सानिका गुरव, सुलोचना इळकर तसेच सुधाकर गुरव, अविनाश मोरे, पूजा हातगे आदी उपस्थित होते.
---
पाण्याचे महत्त्व अधोरेखित
‘जलदिंडी’च्या माध्यमातून महिलांनी आणि ग्रामस्थांनी पाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘जल बंधन’ उपक्रमातून पाणी जपण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. पाणी गुणवत्ता प्रात्यक्षिकाद्वारे सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याची चाचणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय ‘जल संकल्प शपथ’ घेऊन नागरिकांनी पाणी वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी ‘हर घर जल’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT