चिपळुणात आज रंगभरणसह
चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा
चिपळूण ः जलजागृती सप्ताह व जागतिक जलदिनानिमित्त जलसंपदा आणि शिक्षण विभागातर्फे सोमवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता रामतीर्थ तलाव येथे रंगभरण, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना रेखाचित्र देण्यात येणार असून, त्यामध्ये त्यांनी रंग भरावयाचे आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना पाणी वाचवा जीवन वाचवा, जलप्रदूषण टाळा व पाण्याची साठवणूक व पुनर्वापर, असे विषय देण्यात आले आहेत.
याच पद्धतीने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा झाल्यावर त्याच ठिकाणी ११ वा. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, उपसभापती संदेश आयरे व उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.