कोकण

चिपळूण ः नागावे येथे प्लास्टिक गोदाम आगीत खाक

CD

ratchl211.jpg ः
32409
चिपळूण ः नागावे येथे लागलेल्या आगीत प्लास्टिकचे गोदाम खाक झाले.
-----------
नागावे येथे प्लास्टिक गोदाम आगीत खाक
पाच ट्रक प्लास्टिक जळाले : सहा कामगार पळाल्याने बचावले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः तालुक्यातील नागावे येथे शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागून प्लास्टिक गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने आगीचे लोट व काळा धूर आकाशात पसरला. यानंतर पाऊण तासाने महाजनकोचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. या गोडाऊनमध्ये ६ कामगार कार्यरत होते; मात्र आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनास्थळांवरून पळ काढला व ते बचावले.
नागावे येथील उद्योजक चंद्रकात पालांडे यांच्या जागेत हे गोडाऊन होते. त्यांनी आपले क्रेशर बंद झाल्यानंतर ही जागा एका भंगार व्यावसायिकाला भाड्याने दिली होती. त्या ठिकाणी संबंधित व्यक्तीकडून सुमारे पाच ट्रक प्लास्टिक गोळा करून ठेवण्यात आले होते. संबंधित व्यावसायिक हे प्लास्टिक पाण्याने स्वच्छ करून अन्य कंपन्यांना पुरवठा करत होता. शनिवारी दुपारी ४च्या सुमारास या भागात अचानक वणवा लागून आग गोदामापर्यंत आली आणि आगीचा भडका उडाला. सुमारे पाऊण तास ही आग भडकतच होती. त्यानंतर महाजनकोचा बंब घटनास्थळी दाखल झाला व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर या बंबातील पाणी संपले.
सुदैवाने, त्याचवेळी चिपळूण नगरपालिकेचा अग्नीशमन बंब दाखल झाल्यानंतर त्यातील पाणी महाजनकोच्या बंबात टाकण्यात आले. प्लास्टिक जळत असल्याने आग विझवण्यात अडचणी येत होत्या. या आगीत सुमारे पाच ट्रक प्लास्टिक जळून खाक झाले आहे. सुदैवाने, यामध्ये कोणालाही इजा झाली नसली तरी गोदाम मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. येथे सहा परप्रांतीय कामगार काम करत होते; मात्र आगीचा भडका उडाल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. परिणामी, त्याचा जीव वाचला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: फेरारीतून एन्ट्री, हाफ चड्डी अन्... ; Mumbai Indians च्या सराव सत्राला 'अतरंगी' स्टाईलमध्ये पोहोचला हार्दिक पांड्या...

Ashok Kharat Files: ''आमचे 'हे' त्यातले नाहीत!'', अशोक खरातच्या पत्नीने केली नवऱ्याची पोलखोल

Pali News : पालीत पोलिसांचा आदर्श उपक्रम; ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा, सामाजिक ऐक्य दृढ

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

'साहेब! लग्नाला ६० वर्ष झालीत, तरीही माझे हे...'; ८८ वर्षीय पतीविरोधात ८५ वर्षीय महिलेची भलतीच तक्रार, काय घडलं?

SCROLL FOR NEXT