कोकण

युद्ध पदके हीच खरी आयुष्याची पुंजी

CD

32609


युद्ध पदके हीच खरी आयुष्याची पुंजी

विठ्ठल सावंत ः कलंबिस्त येथे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २२ ः ​आजच्या बदलत्या युद्धाच्या तुलनेत त्या काळातील युद्धे थेट आणि अधिक खडतर होती. सैन्य दलात मिळालेली युद्ध पदके हीच माझ्या आयुष्याची खरी कमाई आहे, असे भावोद्‌गार मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे युद्धवीर माजी सैनिक विठ्ठल सावंत यांनी सत्कारप्रसंगी काढले.
भारत-पाक आणि भारत-चीन यांसारख्या ऐतिहासिक युद्धांमध्ये शत्रूशी दोन हात करून शौर्य गाजवणारे ९० वर्षीय युद्धवीर, मराठा लाईट इन्फंट्री बटालियनचे श्री. सावंत यांचा जिल्हा ग्रंथालय संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने गौरव करण्यात आला. तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील सैनिकी परंपरेचा वारसा जपणारे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कलंबिस्त येथे श्री. सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन जिल्हा ग्रंथालय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या जीवनप्रवासाचा सन्मान केला.
​याप्रसंगी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले, ‘आज या ९० वर्षांच्या सैनिकाच्या चरणांना स्पर्श करताना माझे मन भारावून गेले आहे. त्यांच्यासारख्या सैनिकांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी अर्पिले नसते, तर आज आपण गावात सुखी-समाधानी राहू शकलो नसतो. खऱ्या अर्थाने एका देशसेवकाच्या सानिध्यात येणे हे माझे भाग्य असून, अशा शूर योद्ध्यामध्येच मला देव दिसतो.’
​श्री. सावंत यांनी आपल्या लष्करी सेवेतील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी १५ वर्षे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा बजावली, ज्याची सुरुवात बेळगाव येथून झाली होती. १९७१ चे भारत-पाक युद्ध आणि १९७२ चे भारत-चीन युद्ध यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष रणांगण गाजवले. विशेष म्हणजे, तब्बल दीड वर्षे त्यांनी इस्रायलमधील कठीण आणि संघर्षमय युद्धजन्य परिस्थितीत देश आणि कुटुंबापासून दूर राहून सेवा दिली, असेही त्यांनी नमूद केले. ​लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कुडाळ येथील वायमन गार्डनमध्ये २० वर्षे सेवा दिली. सध्या ९० वर्षांचे असूनही त्यांचे आरोग्य सुदृढ असून ते आजही कृषी, पशुसंवर्धन आणि आध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आहेत. त्यांची वाचनप्रेम आणि संवाद कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. या सत्कार सोहळ्याला जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव राजन पांचाळ, जिल्हा संचालक ॲड. संतोष सावंत, गुरुनाथ मडवळ, सतीश गावडे, रमेश सावंत यांच्यासह सावंत कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT