32615
जलसंवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी
हर्षदा वाळके ः तळेरे ग्रामपंचायतीतर्फे ‘जल महोत्सव’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २२ : पाणी हे जीवन असून त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके यांनी ''जल महोत्सव'' कार्यक्रमप्रसंगी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, पंचायत समिती कणकवली आणि ग्रामपंचायत तळेरे यांच्या संयुक्त विद्यमाने येथे ''जल महोत्सव'' मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत दत्त मंदिर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य प्राची इसवलकर, पंचायत समिती सदस्य राजेश जाधव तसेच सहायक गट विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) व नाबार्ड अभियंता उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामपंचायत तळेरे येथील नळ कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ''पाणी बचत, जलसंवर्धन आणि गावची स्वच्छता'' या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली. ही रॅली दत्त मंदिर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत नेण्यात आली. तेथे सभापती वाळके यांच्या हस्ते फीत कापून नवीन पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच संदीप घाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.