कोकण

''कृषी''तर्फे कणकवलीत उद्या ''खरेदीदार-विक्रेता'' संमेलन

CD

‘कृषी’तर्फे कणकवलीत उद्या
‘खरेदीदार-विक्रेता’ संमेलन

​सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २२ ः प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सूक्ष्म उद्योगांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागातर्फे मंगळवारी (ता. २४) ‘खरेदीदार व विक्रेता संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ​हे संमेलन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत कणकवली कॉलेज, कणकवली येथे होणार आहे, तर खरेदीदार विक्रेता यांचे करार दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहेत.
या संमेलनामुळे प्रक्रियादार आणि शेतकऱ्यांना आपली उत्पादने थेट मोठ्या खरेदीदारांसमोर सादर करण्याची संधी मिळून थेट बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात सामंजस्य करार घडवून आणण्यासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध होऊन व्यावसायिक करार करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू, कोकम, आंबा आणि फणस या प्रमुख पिकांच्या प्रक्रियायुक्त पदार्थांचे मार्केटिंग आणि पॅकेजिंग यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चासत्र होणार आहे. नवीन व्यवसाय संधी आणि थेट व्यवहार करण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ​या संमेलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सूक्ष्म अन्न प्रक्रियादार, शेतकरी गट आणि खरेदीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT