कोकण

रत्नागिरी -मिरकरवाडा परिसरात ईद उत्साहात साजरी

CD

मिरकरवाडा परिसरात
ईद उत्साहात साजरी
रत्नागिरी : तीस दिवसांच्या खडतर उपवासानंतर (रोजा) आलेल्या रमजान ईदचा उत्सव रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. मिरकरवाडा परिसरातील सात मोहल्ले आणि चार प्रमुख मशिदींवर करण्यात आलेली नयनरम्य विद्युत रोषणाई पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. आखाती देशांतील युद्धाचे सावट आणि विमानांच्या तिकिटांचे वाढलेले दर असूनही आपल्या मातीतील सण साजरा करण्यासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यंदाच्या ईदचे विशेष कौतुक म्हणजे रणरणत्या उन्हातही चिमुकल्यांनी पूर्ण ३० दिवस रोजा पाळून आपली श्रद्धा आणि चिकाटी दाखवून दिली. या चिमुकल्यांच्या ईमानी जज्ब्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मंत्री सामंत यांच्यासोबत त्यांचे जिवलग मित्र शब्बीर वस्ता, नगरसेवक सोहेल साखरकर, नगरसेविका अफरीन होडेकर, माजी नगरसेवक नुरूद्दीन पटेल, चेअरमन इमरान मुकादम, मझर मुकादम, राजू शेठ, मसूद मुकादम, उबेद होडेकर आणि यासिन मजगावकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (PWC) अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण

SCROLL FOR NEXT