कोकण

रत्नागिरी- रामरक्षा म्हणजे अमूल्य ठेवा

CD

rat23p3.jpg-
32674
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती आयोजित रामरक्षा भावार्थ कार्यक्रमात बोलताना संध्या सप्रे. सोबत स्मिता जोशी.

रामरक्षा म्हणजे अमूल्य ठेवा
संध्या सप्रे; राष्ट्रसेविका समितीतर्फे श्रीराम उत्सव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : "रामरक्षा हा आपल्या ऋषीमुनींनी दिलेला एक अमूल्य ठेवा आहे. हा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द करणे, हे आपले कर्तव्य आहे. जर पूर्ण रामरक्षा म्हणणे शक्य नसेल तर दैनंदिन कामे करताना केवळ ''राम'' या दोन अक्षरांचा जप केला तरी जीवनात सफलता येते आणि जीवन सार्थकी लागते. हा सोपा मार्ग आपण आपल्या मुलांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवला पाहिजे. रामनामाच्या बळावर आपण जीवनरूपी भवसागर नक्कीच तरून जाऊ शकतो" असे प्रतिपादन संध्या सप्रे यांनी केले.
दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीतर्फे श्रीराम नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून टिळकनगर उद्यान येथे श्री रामरक्षा भावार्थ सार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका मावशी केळकर यांनी लिहिलेल्या रामायणावरील प्रवचनांच्या वाचनातून रामायणाकडे पाहण्याचा एक तार्किक दृष्टिकोन समितीच्या सेविकांना सातत्याने मिळत आला आहे. याच प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले. सुरवातीला प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहर बौद्धिक प्रमुख स्मिता जोशी यांनी प्रास्ताविक केले. दक्षिण रत्नागिरी सह-प्रचारप्रमुख कामाक्षी गद्रे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT