वाशिष्ठी, जगबुडी, अर्जुना,
कोदवली नद्या होणार गाळमूक्त
किनारी गावांना दिलासा; पावसाळ्यातील पुरावर नियंत्रण
रत्नागिरी, ता. २३ः कोकणातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ काढण्याच्या मोहिमेने आता मोठी गती घेतली आहे. चिपळूणची वाशिष्ठी, खेडची जगबुडी आणि राजापूरच्या अर्जुना व कोदवली नद्यांच्या पात्रात साचलेला गाळ बाहेर काढण्यासाठी शासन आणि सामाजिक संस्थांनी कंबर कसली असून, नदीकाठच्या गावांना दिलासा मिळणार आहे.
चिपळूणच्या वाशिष्ठी नदीमध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाने अलोरे येथून पाच एक्स्कॅव्हेटर आणि ११ डंपर या मोहिमेत उतरवले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ९७ हजार ६३१ घनमीटर गाळ काढण्यात आला असून, नाम फाउंडेशननेही यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. डिसेंबर २०२१ पासून आजतागायत वाशिष्ठीतून तब्बल २१.३६ लक्ष घनमीटर गाळ उपसण्यात प्रशासनाला यश आले आहे.
खेडमधील जगबुडी नदीतही जलसंपदा विभागाची यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे. या ठिकाणी तीन एक्स्कॅव्हेटर आणि तीन डंपरच्या साहाय्याने गाळ काढला जात असून, २०२४ पासून आतापर्यंत ५१ हजार ७९ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे नदीची पाणी साठवण्याची क्षमता वाढून पावसाळ्यातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे.
चौकट
अतिरिक्त ५० लाखाचा निधी
राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी जिल्हा नियोजन समितीने विशेष पुढाकार घेतला आहे. मागील वर्षी सुमारे २९ हजार ३७० घनमीटर गाळ काढल्यानंतर यंदा या कामासाठी अतिरिक्त ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे तसेच, विलवडे-मुचकुंदी नदीसाठीही २० लाख रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी नाम फाउंडेशनच्या यंत्रसामग्रीद्वारे गाळ काढण्यासाठी वापरला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.