कोकण

मिठेवाडांचा महावितरणतर्फे सत्कार

CD

अंगतकुमार मिठेवाडांचा
महावितरणतर्फे सत्कार
खेड : महावितरणच्या खेड उपविभागांतर्गत शहर शाखेत कार्यरत असलेले वरिष्ठ तंत्रज्ञ अंगतकुमार मिठेवाड यांनी आरसीआय थकबाकी पूर्णपणे वसूल करून ‘निरंक’ करण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या विशेष कामगिरीबद्दल उपकार्यकारी अभियंता सकपाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महावितरणच्या वसुली मोहिमेत आरसीआय थकबाकी वसुलीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्यकारी अभियंता बाबरेकर व उपकार्यकारी अभियंता सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मिठेवाड यांनी केलेल्या नियोजनबद्ध आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे ही प्रलंबित थकबाकी वसूल करण्यात यश आले. यामुळे विभागाच्या महसूल वाढीला मोठी मदत झाली आहे. या वेळी सकपाळ म्हणाले, मिठेवाड यांच्यासारखे समर्पित काम प्रत्येक कर्मचाऱ्याने केल्यास महावितरणची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. या कौतुक सोहळ्याला शाखेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आंबडसमध्ये शुक्रवारी
समाधान शिबिर
खेड ः तालुक्यातील धामणंद पंधरागाव परिसरातील आंबडस येथील हायस्कूलमध्ये शुक्रवारी, २७ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी राज्यशासनामार्फत मंडळ स्तरावर अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न व तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. क्षेत्रीय स्तरावर प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी हे शिबिर एक महत्त्वाची संधी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT