कोकण

मोगरा फुलला...तून उलगडला माऊलींचा जीवनपट

CD

मोगरा फुलला’तून माऊलींचा जीवनपट
संतसाहित्याचा ध्यास धरा; व्याख्याते गणेश शिंदे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ः जय जय रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान, मोगरा फुलला या विविध रचनांनी ज्ञानेश्वर माऊलींचा जीवनपट उलगडत गेला आणि माऊलींच्या साहित्य लिखाणातील मराठी भाषेचा गोडवा रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. माऊलींच्या भक्तिमय गीतांना त्यावरील माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण प्रवचनाने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५०व्या जयंती वर्षानिमित्त आध्यात्मिक, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या अंतर्गत ज्ञानियांचा राजा ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम सोमवारी (ता. २३) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पार पडला. सुप्रसिद्ध व्याख्याते प्रवचनकार गणेश शिंदे यांनी ज्ञानेश्वरांचा जीवनपट उलगडला.
सुरुवातीला प्रवचनकार गणेश शिंदे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मच्छींद्र पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी मनोहर जोशी, दत्ता केळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर जय जय रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान या माऊलींच्या रचनांनी मैफल सुरू झाली. मोगरा फुलला, रूणू झुणू रूणू झुणू रे भ्रमरा....... या अभंगानंतर प्रवचनकार शिंदे यांनी प्राकृत मराठी ज्ञानेश्वरीतील ज्ञानेश्वरांच्या लिखाणातील मराठी भाषेचा गोडवा स्पष्ट केला. तसेच विठ्ठलाचे संतांवरचे ओसंडून वाहणारे प्रेम, ज्ञानेश्वरांचे पसायदान यावर भाष्य केले. अबीर गुलाल उधळीत अभंगानंतर शिंदे यांनी कृष्णजन्माची कहाणी आणि ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरात असावी, असे सांगितले. त्यानंतर विठ्ठलपंत आणि रूक्मिणी यांची मुलं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांचा जीवनपट उलगडताना रसिकांच्या मानाचा ठाव घेतला. कानडा राजा पंढरीचा या अभंगातून रसिकांना पंढरपुरचे दर्शन घडवले. तसेच दुसऱ्यांची निंदा करण्यात वेळ घालवू नका तर संतांच्या मांदियाळीत, साहित्यात वेळ घालवा असेही त्यांनी सांगितले.
-------
ज्ञानेश्वर माऊलींचे जन्मवर्ष होणार साजरे
७५०व्या ज्ञानेश्वरांच्या जन्मवर्ष जगभरात साजरे व्हावे यासाठी शासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नुकताच मॉरिशसलादेखील हा कार्यक्रम झाला असल्याचे शिंदे यांनी सांगितले. उत्तम गायक कलाकार, साथसंगतीने कार्यक्रम रंगला. अभंग, भारूड, गोंधळ गीत अशा उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या कार्यक्रमाला रसिकांनी दाद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT