कोकण

शिडवणे क्र. १ शाळेच्या विकासाचा निर्धार

CD

swt249.jpg
32980
शिडवणे ः जिल्हा परिषद शाळा क्र. १ मध्ये स्नेहमेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थी आणि मान्यवर.

शिडवणे क्र. १ शाळेच्या विकासाचा निर्धार
माजी विद्यार्थी एकवटले; स्नेहमेळाव्यात मदतीची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : ‘शाळा सुटली तरी नाती सुटत नाहीत’ या भावनेतून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे क्र. १ शाळेचा ‘माजी विद्यार्थी मेळावा २०२६’ उत्साहात आणि भावूक वातावरणात पार पडला. या सोहळ्यात उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शाळेचा कायापालट करण्यासाठी आर्थिक आणि वस्तुरूप मदत करण्याचे अभिवचन दिले.
​मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थी प्रशांत वाघरे यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देतानाच, आज शाळेला माजी विद्यार्थ्यांच्या खंबीर पाठिंब्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी तथा माजी शिक्षक सुहास पाताडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचे किस्से सांगितले, तर माजी शिक्षक बाळासाहेब कोलते यांनी खेळाडू घडवताना आलेले अनुभव कथन केले.
शिडवणे सरपंच रवींद्र शेट्ये, ​पोलिसपाटील व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य समीर कुडतरकर, गावठण उत्कर्ष मंडळाचे विलास कुडतरकर यांनी आपल्या भाषणातून शाळेला अधिक सुसज्ज आणि डिजिटल बनवण्यासाठी सर्वांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले.
या मेळाव्याला सरपंच रवींद्र शेट्ये, समीर कुडतरकर, प्रशांत वाघरे, विलास कुडतरकर, महेश शेट्ये, राजेंद्र शेट्ये, शिवराम जाधव, मनोहर टक्के, दयानंद कुडतरकर, प्रमोद खानविलकर, प्रदीप वारीसे, गणेश वारीसे, संचिता टक्के, जान्हवी टक्के, मंगेश वारीसे, जयेश शेट्ये, तुकाराम शेट्ये, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, तारीफ शेख, दीपक बोभाटे, रामदास कुडतरकर, डॉ. प्रणव पाटील, दत्ताराम वारीसे, बाळासाहेब कोलते, सुहास पाताडे, वेदिका चव्हाण, सुरेंद्र यादव, हेमा वंजारी, शिक्षणतज्ज्ञ मनोहर कोकाटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT