कोकण

मच्छिमारांसाठी वीजदर सवलत

CD

मच्छिमारांसाठी
वीजदर सवलत
सिंधुदुर्गनगरीः कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णयानुसार मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यव्यावसायिक, मत्स्यकास्तकार, मत्स्यबीज मत्स्यबोटूकली संवर्धक तसेच मत्स्यव्यवस्थापनाशी संबंधित घटकांना (मत्स्यप्रक्रिया उद्योग वगळून) कृषी समकक्ष दर्जा देण्यात आलेला आहे. याअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत देण्यात येणार असून ही सवलत लघुदाब, उच्चदाब तसेच अतिउच्चदाब वीज जोडण्यांसाठी लागू राहणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज भरून सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय येथे सादर करावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयार्मात करण्यात आले आहे. अर्जाचा नमुना तसेच अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय किंवा ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..................
वरवडेतील शिबिरात
३६ जणांचे रक्तदान
कणकवलीः वरवडे येथील कोष्टीवाडी मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ३६ दात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमात रक्तदात्यांना प्रमाणपत्र, गुलाबपुष्प, भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विजय कडुलकर, उपाध्यक्ष प्रशांत सावंत, सचिव संदीप राणे, खजिनदार दर्शन पोयेकर, सहसचिव तेजस पोयेकर, धनंजय सावंत, शरद लाड, नरेंद्र कांबळी, स्वप्नील सावंत, तुषार बुचडे, रविराज कांबळी, प्रभाकर बुचडे, सुभाष सावंत, अक्षय पोयेकर, दीपक पोयेकर यांच्यासह ओरोस रक्तपेढीचे डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.
....................
मालवण येथे आज
व्यवसाय मार्गदर्शन
मालवणः महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा विभागामार्फत सर्व प्रकारच्या अन्न व खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोफत प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाच्या सहयोगाने उद्या (ता. २५) दुपारी २.५५ ते सायंकाळी ७ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. अन्नसुरक्षा परवानाधारक तसेच संबंधित कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य केले आहे. प्रमाणपत्र नसल्यास अन्नसुरक्षा परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याने सर्व परवानाधारकांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह या मोफत प्रशिक्षणास उपस्थित राहून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी केले आहे.
....................
सावंतवाडीत उद्या
रामनवमी उत्सव
सावंतवाडी ः शहरातील भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर येथे गुरुवारी (ता. २६) श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळपासून धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, राम जन्मोत्सव, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम, १० वाजता कोलगाव येथील आठवीमधील विद्यार्थिनी कीर्तनकार दुर्वा सावंत हिचे सुश्राव्य कीर्तन, नंतर श्री राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवास रामभक्त व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विठ्ठल मंदिर व दत्त मंदिर देवस्थान ट्रस्ट, भटवाडी-सावंतवाडी यांनी केले आहे.
....................
''महाराजस्व'' शिबिराचे
आज वेत्येत आयोजन
सावंतवाडी ः महाराष्ट्र शासन व महसूल वनविभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उद्या (ता. २५) ग्रामपंचायत वेत्ये येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. या शिबिरामध्ये क्षेत्रफळ महसूल मंडळातील इन्सुली, कुंभार्ली, वेत्ये, निगुडे, रोणापाल, शेर्ले आणि कास या गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शिबिरात नागरिकांना उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रेशनकार्ड संबंधित कामे, संजय गांधी निराधार योजना, पी.एम. किसान योजना आणि अ‍ॅग्रीस्टॅक नोंदणी यांसारख्या विविध शासकीय योजनांचे लाभ व प्रमाणपत्रे मिळवता येतील. तसेच महसूल विभागाशी संबंधित अन्य प्रलंबित कामांचाही निपटारा यावेळी करण्यात येणार आहे.
......................
वेतोरेत एप्रिलला
धार्मिक कार्यक्रम
वेंगुर्ले ः वेतोरे-गोसावी मठ येथील श्री देव भूतोबा मंदिरात ११ एप्रिलला सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा होणार आहे. यानिमित्त दुपारी १२ वाजता आरती, तीर्थप्रसाद, १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी भजने, रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचे नाटक होणार आहे.
......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

Bank News : मार्च एंडची लगबग; जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची गर्दी वाढली

SCROLL FOR NEXT