कोकण

हिंदी शिक्षक मंडळातर्फे रविवारी सिंधुदुर्गनगरीत पुरस्कार वितरण

CD

हिंदी शिक्षक मंडळातर्फे रविवारी
सिंधुदुर्गनगरीत पुरस्कार वितरण
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २४ ः सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आयोजित जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलनामध्ये हनमंत गोविंद दळवी स्मृती विविध पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी (ता. २९) येथील माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी सभागृह येथे सकाळी १० वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात शांताराम विष्णू कुलकर्णी माध्यमिक विद्यामंदिर मोंड-देवगड येथील आसावरी कदम यांना आदर्श हिंदी शिक्षक पुरस्कार, पेंढरी पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय पेंढरी-देवगड येथील सत्यवान लाडगावकर यांना ‘आदर्श प्रधानाध्यापक’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘आदर्श हिंदी प्रचारक’ पुरस्काराने विविधा देसाई (भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय माजगाव-सावंतवाडी), शारदा गावडे (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी), अनुजा सावंत (डिगस माध्यमिक विद्यालय, कुडाळ), महेंद्र परिपत्ये (न्यू इंग्लिश स्कूल आचरा-मालवण), धाकलू डवरी (शिरगाव हायस्कूल देवगड), राजेश नारकर (सरस्वती माध्यमिक विद्यालय, नांदगाव-कणकवली), विशाखा कांबळे (कुर्ली माध्यमिक विद्यालय वैभववाडी), श्रेया तावडे (एस. बी. राणे हायस्कूल नारिंग्रे देवगड) यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तर बयाजी बुरान (माध्यमिक विद्यालय, कनेडी) यांना विशेष सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन हिंदी विवेक मासिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक सन्मान समितीचे मुख्य समन्वयक आश्लेषा पारकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी पुणे येथील भाषा अनुवादक राजेश होले यांच्यासह संजय वेतोरेकर, कैलास जाधव, समीर परब, सुमंत दळवी आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT