पानवळ, शिंदेवाडीत रामनवमी
उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, दि. २४ : तालुक्यातील पानवळ- शिंदेवाडी येथे यंदाही श्री रामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने गुरूवारी (ता. २६) आणि २७ मार्चला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्चला सकाळी ७ वा. प्रभूंची पूजा होईल. १० वा. हभप श्रीनिवास पेंडसे महाराज (संगमेश्वर) यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२ वा. प्रभूंचा जन्मोत्सव, आरती व महाप्रसाद होईल. १ ते ३ या वेळेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे. ३ ते ४ या वेळेत हळदीकुंकू, सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मिरवणूक काढण्यात येईल. रात्री १०.३० वा. श्री विराट विश्वकर्मा नाट्यनमन मंडळ, शिवराज कलामंच रत्नागिरी, संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन सादर होईल. २७ ला सकाळी ७ वा. प्रभूंची पूजा, १० वा. अभिषेक, दुपारी २ वा. सत्यनारायणाची महापूजा आयोजित आहे. रात्री ८ वा. लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, रत्नागिरी तसेच सुप्रसिद्ध गायक रोशन ढवण यांचे भजन होईल. ८ वा. महाप्रसाद व १०.३० वा. श्री रामकला मंडळ यांचे बहुरंगी नमन सादर होईल. या सर्व कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.