कोकण

''लॅब ऑन व्हिल्स'' उपक्रम कौतुकास्पद

CD

swt2417.jpg
O33035
घारपी ः लॅब अँण्ड व्हिल्स अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षक शिवप्रसाद नाटेकर.

''लॅब ऑन व्हिल्स'' उपक्रम कौतुकास्पद
जे. डी. पाटील ः घारपी शाळेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २४ ः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे ज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ''लॅब ऑन व्हिल्स'' हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन घारपी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी केले.
रिट संस्था, पुणे व उमेद फाउंडेशनच्यावतीने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध प्रयोग प्रत्यक्ष दाखवले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजण्यास मदत होत आहे. सध्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील निवडक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दोडामार्ग तालुक्यातील तळकट क्र.१, मोरगाव क्र.१, प्राथमिक शाळा झोळंबे, कोलझर हायस्कूल तसेच सावंतवाडी तालुक्यातील बांदा क्र.१, प्राथमिक शाळा असनिये, घारपी, विलवडे क्र.१, डेगवे हायस्कूल व असनिये हायस्कूल या शाळांमध्ये ''लॅब ऑन व्हिल्स''च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोग दाखविण्यात येत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांशी संबंधित विविध प्रयोग दाखवण्यात येतात. घारपी येथील प्राथमिक शाळेत या प्रयोगशाळेची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग पाहत त्यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमांतर्गत शिवप्रसाद नाटेकर यांची मार्गदर्शक शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात चालू करण्यासाठी उमेद‌ फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाथाडे, प्रदीप नाळे, जे. डी. पाटील याचबरोबर उमेदचे सर्व सदस्य व रिट इंडियाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. घारपी शाळेत प्रारंभप्रसंगी मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स उद्या न खेळताच स्पर्धेबाहेर होणार? महत्त्वाचे अपडेट्स, RCB विरुद्धच्या लढतीपूर्वी वातावरण बिघडले

Crime: तोंडात कापड कोंबले, हातपाय दोरीने बांधले, महिलेला निर्घृणपणे संपवले, २ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, नेमकं काय घडलं?

SSC Topper Story:गरिबी, संघर्ष आणि आईच्या कष्टांवर मात करत मानसी बागुलची दहावीत ९८.२० टक्के झेप

Tamil Nadu Politics: मोठा यू-टर्न! आधी 'त्या' अटींनी वाढवला तिढा; आता VCK कडून TVK ला बिनशर्त पाठिंबा, तमिळनाडूत राजकीय नाट्य

जिंकलंस पोरा...! साताऱ्याच्या साहिल जाधवने Archery World Cup मध्ये जिंकलं पदक; आईने स्वतःचे दागिने विकून घेऊन दिलेला धनुष्य-बाण

SCROLL FOR NEXT