swt2423.jpg
33105
सावंतवाडी ः ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना प्रमोद कामत व इतर मान्यवर.
सावंतवाडीत ९४७ रुग्णांची तपासणी
पालकमंत्र्यांची संकल्पना ः ‘मेगा मेडिकल स्पेशालिटी’ शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दुर्गम भाग आणि आरोग्य सुविधांची कमतरता लक्षात घेता, जिल्ह्यातील दुर्बल व वंचित घटकातील रुग्णांना एकाच छताखाली सर्व प्रकारच्या ‘स्पेशालिटी’ आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने पालकमंत्री नीतेश राणे यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी येथे भव्य ''मेगा मेडिकल स्पेशालिटी'' तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ९४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा लाभ रुग्णांना मिळाला. विशेष म्हणजे, आता हे शिबिर दर तीन महिन्यांनी आयोजित केले जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी पालिकेचे प्रभारी नगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुधीर आडिवरेकर, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, नगरसेवक देव्या सूर्याजी, प्रा. सतीश बागवे, प्रा. रवी जाधव, रुपा मुद्राळे उपस्थित होते.
पालकमंत्री राणे यांच्या पुढाकारामुळे इतर जिल्ह्यांतील स्पेशालिस्ट आणि सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर शिबिरासाठी उपलब्ध करून दिले होते. तसेच टूडी इको आणि सोनोग्राफी मशिन्सची विशेष व्यवस्था केली होती. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांसह, डेरवणचे वालावलकर रुग्णालय, मुंबईचे कोकिळाबेन रुग्णालय आणि इतर नामवंत संस्थांच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सेवा दिली.
या आरोग्य शिबिरात एकूण ९४७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यात सोनोग्राफी, प्रौढ टूडी इको, बाल टूडी इको, रक्त तपासणी, एक्स-रे, ईसीजी आणि सीटी-स्कॅन तसेच पोटाची एन्डोस्कोपी, टंग टाई, एक्सीजन, हर्नियोप्लास्टी आणि अस्थिव्यंग शस्त्रक्रिया अशा एकूण ७ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.
शिबिरात हृदयविकार, कर्करोग, नेत्ररोग आणि बालरोग अशा गंभीर आजारांवर विशेष भर देण्यात आला. डॉ. सागर कोल्हे (मूत्रविकार तज्ज्ञ), डॉ. अनिकेत वजराटकर, डॉ. पल्लवी देशमंतार (जनरल सर्जन), डॉ. निर्मला सावंत (हृदयरोग), डॉ. अश्विनी नाईक (फुफ्फुस विकार) यांच्यासह मानसोपचार, अस्थिव्यंग, स्त्रीरोग आणि दंतशल्य अशा विविध विभागांतील डॉक्टरांनी रुग्णांना मोलाचा सल्ला दिला.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे, डॉ. अनंत डवंगे आणि डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम, अधिपरिचारिका (नर्सिंग स्टाफ), रोटरी क्लबचे पदाधिकारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.