कोकण

श्री क्षेत्र गणपतीपुळेत खिचडी प्रसाद वेळेत वाढ

CD

गणपतीपुळेत खिचडी प्रसाद वेळेत वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र व्यावसायिक गॅसटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर गणपतीपुळे येथील संस्थान श्रीदेव गणपतीपुळे प्रशासनाने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी खिचडी प्रसाद भोजनाची वेळ एक तासाने वाढवली आहे.
देवस्थानने भाविकांच्या सोयीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. दुपारी साडेबारा ते ३ वाजेपर्यंत आणि सायंकाळी सव्वासात ते रात्री पावणेआठपर्यंत मोफत महाप्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. इराणमधील युद्धामुळे व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. पुरवठा बंद असल्यामुळे गणपतीपुळे परिसरातील अनेक हॉटेल्स आणि खानावळी सद्यःस्थितीत बंद आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांची गैरसोय होत आहे. भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन देवस्थानच्या पंचकमिटीने सामाजिक बांधिलकी जपत दररोज दिल्या जाणाऱ्या मोफत खिचडी प्रसाद भोजनाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून या संकटाच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना अन्नाचा लाभ घेता येईल. हॉटेल व्यावसायिक अडचणीत असताना देवस्थानने उचललेले पाऊल भाविकांसाठी आधार ठरत आहे. जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन गणपतीपुळे देवस्थान कमिटीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल; राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Latest Marathi News Live Update : आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Virar News : गॅस टंचाईवर मात करत कळंब हॉटेल चालकाने बनवली टाकाऊ इंजिन ऑईलवर चालणारी शेगडी

SCROLL FOR NEXT