कोकण

कलमठ येथे आज श्रीराम जन्मोत्सव

CD

कलमठ येथे आज
श्रीराम जन्मोत्सव
​कणकवलीः कलमठ बाजारपेठ येथील श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात उद्या (ता. २६) श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सकाळी १० वाजता घटस्थापना, ११ वाजता रामजन्मोत्सवावर कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव, सायंकाळी भजनांचा कार्यक्रम, रामरक्षा स्तोत्र पठण, रंगभूषा, वेशभूषा स्पर्धा होणार आहे. या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
....................
​वराड येथे आज
पुण्यतिथी उत्सव
​मसुरेः मालवण तालुक्यातील वराड-कुसरवेवाडी येथील राणे महाराज यांच्या मठात उद्या (ता. २६) रामनवमी उत्सव व शुक्रवारी (ता. २७) राणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. रामनवमीनिमित्त उद्या सकाळी ९ वाजता मूर्ती अभिषेक, १० वाजता रामजन्माचे कीर्तन, दुपारी १२ वाजता रामजन्म, १ वाजता महाआरती, १.३० वाजता अखंड महाप्रसाद, ३ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता बुवा अजित गोसावी यांचे भजन, रात्री ८ वाजता बुवा ज्ञानदेव मेस्त्री यांचे भजन. राणे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी (ता. २७) सकाळी ९ वाजता राणे महाराज यांच्या पादुकांवर अभिषेक, १० वाजता रामनाम जप व हरिपाठ, दुपारी १ वाजता महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता नामदेव महाराज भक्त मंडळाचा हरिपाठ व भजन, ४.३० वाजता पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता देवी माऊली भजन मंडळ, किनळोस यांचे वारकरी भजन होणार आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन राणे महाराज सेवा ट्रस्टने केले आहे.
........................
​इन्सुलीत आज
विविध कार्यक्रम
​बांदाः इन्सुली सावंतटेंब येथील विसोटी मंदिर येथे उद्या (ता. २६) वार्षिक सत्यनारायण महापूजा व विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता पारंपरिक फुगडी कार्यक्रम, ७ वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्री ९ वाजता भूमिका दशावतार नाट्य मंडळ, मळगाव (संचालक-नितीन आसयेकर) यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
..........................
​कवठणी येथे आज
रामनवमी सोहळा
​सावंतवाडी : कवठणी येथील देवी माऊली मंदिर येथे उद्या (ता. २६) दुपारी रामजन्म उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर रात्री १० वाजता श्री देवी माऊली हौशी नाट्यमंडळाच्या वतीने देवी माऊली रंगमंच येथे श्री देवी माऊली नाट्य मंडळाचे आत्माराम भगत लिखित, दिग्दर्शित ‘अधिकार’ हे दोन अंकी नाटक होणार आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

Mhada Lottery: लॉटरीशिवाय घरांचे स्वप्न साकार! प्रथम येणाऱ्यास प्राधान्य; २० दिवसांत ६४ घरांची विक्री

Mangalwedha News: अवकाळीने द्राक्ष, डाळिंब मातीमोल, तरीही प्रशासनाचा 'निल' अहवाल; शेतकरी संघटना आक्रमक

IPL 2026 चे सामने कधी आणि कुठे पाहता येणार LIVE? टाइमिंगपासून ते स्ट्रीमिंगपर्यंत... जाणून घ्या चॅनेल आणि OTT डिटेल्स

SCROLL FOR NEXT