- rat२५p१९.jpg
P२६O३३२५२
वलौते : सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन करताना जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर.
----
वलौते सामाजिक सभागृहाच्या इमारतीचे भूमिपूजन
मंडणगड ः तालुक्यातील वलौते या गावी २१ मार्च रोजी सामाजिक सभागृहाचे इमारतीचे ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास रत्नागिरी जिल्हा परिषदचे अध्यक्षा अस्मिता केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर, सभापती प्रणाली चिले, उपसभापती दीपक मालुसरे, पंचायत समिती सदस्य अनिल रटाटे, दीप्ती घडशी व वलौते गावातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने या वेळी समाधान व्यक्त करण्यात आले.
rat२५p२०.jpg ः
२६O३३२५३
मंडणगड: प्रशालेसाठी देण्यात आलेले शैक्षणिक साहित्य स्वीकारताना संस्था चिटणीस महेश मांढरे व शिक्षक.
----
डॉ. आंबेडकर हायस्कूलला शैक्षणिक साहित्य भेट
मंडणगड ः मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला विधान परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकासनिधीतून डिजिटल शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शाळेला दोन संगणक संच, एक प्रिंटर आणि एक स्मार्ट बोर्ड अशी अत्याधुनिक साधने मिळाल्याने अध्यापन अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होणार आहे. या निमित्त आयोजित कार्यक्रमास संस्था चिटणीस संतोष मांढरे, शिक्षक बजरंग गावडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी दीपक पवार उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आमदार निरंजन डावखरे यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.