swt2520.jpg
33292
दोडामार्ग ः नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदन देताना हेल्पलाईन ग्रुपचे पदाधिकारी.
दोडामार्ग - वीजघर रस्ताकाम निकृष्ट
हेल्पलाईन ग्रुपची संयुक्त बैठक घेण्याची मागणी; तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २५ : दोडामार्ग-वीजघर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. येथे ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. या सगळ्या कामाची चौकशी करावी आणि यासाठी ठेकेदार व संबंधित विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप व सामाजिक कार्यकर्त्यांतर्फे आज करण्यात आली. तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आली.
यात म्हटले आहे की, विजघर-दोडामार्ग रस्ता काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आणि पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेबाबतचे नियम ठेकेदाराने धाब्यावर बसवले आहेत. बॅरिकेड, रेडियम, मार्गदशक फलकांअभावी या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. एमएसआयडीसी अंतर्गत आणि त्यांच्या नियंत्रणेखाली या रस्त्याचे काम सुरू असून या यंत्रणेचे कार्यालय कोल्हापूरला आहे. त्यामुळे अधिकारी या साईडवर कधी येतात की नाही, हे कोणालाही कळत नाही. त्यामुळे ठेकेदार आपला मनमानी कारभार करत आहे. रस्ता चांगल्या दर्जाचा होणे अत्यंत गरजेचे असून वाहनचालकांची सुरक्षा देखील महत्त्वाची आहे.
नव्याने होत असलेल्या दोडामार्ग-विजघर रस्त्यावरील लहान मोरी-पुलाची कामे निकृष्ट असल्याने संपूर्ण रस्त्याच्या कामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एमएसआयडीसी अधिकारी उंटावरून शेळ्या हाकत आहेत, तर ठेकेदार मनमानी कारभार करत आहे. ''आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय'' अशी परस्थिती रस्त्याच्या कामाची झाली आहे. या पुलांचे सुरक्षितेच्या दृष्टीने ऑडिट करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा दिला आहे.
१२ मार्चला रात्री पुलाचे सिमेंट काँक्रिट घालून काम करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी त्या पुलावर माती घालून रस्ता वाहतुकीस खुला केला. त्या पुलाच्या मजबुती करणासाठी काँक्रिटला कमीत कमी सहा दिवस पाणी मारणे गरजेचे होते, परंतु त्या पुलाला एकही दिवस पाणी न मारल्याले ते पूल निकृष्ट होहून भविष्यात वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑडिट होणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याचे मूळ ठेकेदार आणि एमएसआयडीसी अधिकारी यांना ६ एप्रिलला आपल्या कार्यालयात बोलावून ‘हेल्पलाईन ग्रुप’ व सामाजिक कार्यकर्त्यांशी संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडवावा; अन्यथा दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप जनहितासाठी आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा देण्यात आला. यावेळी वैभव इनामदार, दयानंद गवस, रवींद्र खडपकर, बाबा मयेकर, सिद्धेश कासार, कानू दळवी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.