कोकण

बंद घरातील नळ चोरणारा गजाआड

CD

बंद घरातील नळ
चोरणारा गजाआड
कणकवली, ता. २६ : तालुक्‍यातील कलमठ गावडेवाडी येथील बंद घर फोडून आतील नळ चोरून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्‍यात घेतले आहे. शंकर नवलाप्पा पवार (वय ६८,रा. सोलापूर) असे त्‍याचे नाव आहे. महिन्यापूर्वीच तो कारागृहातून जामीनावर सुटला होता.
कलमठ गावडेवाडी येथे नंदकुमार साटम (रा. मुंबई) यांचा बंगला आहे. या बंगल्याची देखरेख करणारे कुटुंब गुढी पाडवा सणासाठी १९ मार्च रोजी गावी गेले होते. ते २० मार्च रोजी पुन्हा कलमठ गावडेवाडी येथे आले असता बंगल्‍याचा कडीकोयंडा तुटलेला दिसून आला. त्‍यांनी ही बाब नंदकुमार साटम यांना कळवली. त्‍यानंतर श्री. साटम हे २३ मार्च रोजी दुपारी साडे तीन वाजता कलमठ येथे दाखल झाले. त्‍यांनी बंगल्‍याची पाहणी केली असता बंगल्‍यातील १५ हजार रूपयांचे नळ चोरीस गेल्‍याचे लक्षात आले. श्री. साटम यांनी २४ मार्च रोजी रात्री या चोरीची तक्रार कणकवली पोलिसांत दिली. तर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने तातडीने या चोरी प्रकरणी तपास सुरू केला होता. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित बंगल्‍याच्या परिसरात फिरताना आढळन आला होता. त्‍याअनुषंगाने तपास केला असता संशयित आरोपी शंकर नवलाप्पा पवार हाच या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्‍याचे आढळून आले. त्‍याला कणकवली परिसरातून स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार श्री.गंगावणे आदींनी ताब्‍यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT