कोकण

तब्बल १५० वर्षांनंतर नांदरुखमध्ये एकोपा

CD

swt269.jpg
33433
नांदरुख : येथील १६ व्या शतकातील प्राचीन आणि ऐतिहासिक ''श्री देव गिरोबा मंदिर''.
swt2610.jpg
33432
नांदरुख : येथील श्री देव गिरोबा मंदिरात ऐतिहासिक निर्णयाप्रसंगी उपस्थित असलेले मानकरी, वकलदार आणि ग्रामस्थ.

तब्बल १५० वर्षांनंतर नांदरुखमध्ये एकोपा
ऐतिहासिक निर्णय : जुन्या वादावर पडला पडदा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २६ : तालुक्यातील नांदरुख येथील प्राचीन श्री देव गिरोबा मंदिर देवस्थानबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल १५० वर्षांनंतर मानकरी चव्हाण वकलांमध्ये एकोपा झाला असून, यापुढे मंदिरातील सर्व उत्सव आणि कार्यक्रम एकत्रितपणे साजरे केले जाणार आहेत. ‘‘हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे,’’ अशी भावना मानकरी, वकलदार आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नांदरुख कातवड आणि कर्लाचाव्हाळ येथील श्री देव गिरोबा देवस्थानचे मानकरी, वकलदार व सर्व ग्रामस्थांची सभा गिरोबा मंदिरात झाली. गावातील एकोपा टिकवून ठेवण्यासाठी झालेला अंतिम निर्णय सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन केले होते. याला साळकुंभा, घरटणवाडी, पलीकडची वाडी, कातवड, पटेलवाडी आणि नांदरुख येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये काशिनाथ चव्हाण, गोविंद चव्हाण, आत्माराम चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, सुधीर चव्हाण, सरपंच रामचंद्र (भाऊ) चव्हाण, धनंजय चव्हाण, रमेश चव्हाण, सुनील चव्हाण, समीर चव्हाण आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर मानकरी धनंजय चव्हाण, रमेश चव्हाण, सुनील चव्हाण, समीर चव्हाण आणि सरपंच रामचंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. श्री देव गिरोबा मंदिर हे १६ व्या शतकातील अतिशय प्राचीन मंदिर असून, हा परिसर शिवकालीन वारसा लाभलेला आणि निसर्गरम्य आहे. १८७७ पासून काही अंतर्गत कारणांमुळे या मंदिराचा कारभार विखुरलेला होता. "गावात एकी राहावी या उद्देशाने आम्ही ग्रामस्थांशी चर्चा केली. आता गावकरी, तिन्ही वकली आणि तरुण पिढी एकत्र येऊन गावाच्या सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी कार्य करणार आहोत. सर्वांच्या सहकार्याने आणि ईश्वराच्या कृपेने पुढील ५ वर्षांत येथे एक भव्य मंदिर उभे राहील, असा आमचा संकल्प आहे," असे धनंजय चव्हाण यांनी सांगितले.

चौकट
असे आहे गाव
नांदरुख हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे. ''नांदरुख'' नावाच्या वृक्षावरून गावाला हे नाव पडले. प्राचीन काळी या गावाचा विस्तार मालवण आणि देवबागपर्यंत होता; मालवण शहर ही नांदरुख गावची एक ''वाडी'' होती. त्याकाळी हे गाव मोठी बाजारपेठ होते. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या उभारणीच्या काळात नांदरुखमधूनच अनेक व्यवहार व कामकाज चालत असे, असे सांगितले जाते. काळाच्या ओघात गावाची विभागणी झाली असली, तरी ग्रामदैवत श्री देव गिरोबांचे स्थान सर्वांच्या हृदयात अढळ राहिले आहे.
.....................
कोट
नांदरुख गावाला सोन्याचे दिवस येण्याची ही सुरुवात आहे. सरपंच म्हणून या ऐतिहासिक निर्णयाचा मला सार्थ अभिमान वाटतो. जिथे अनेक ठिकाणी मानापमानावरून कोर्ट-कचेऱ्या होतात, तिथे आमच्या गावाने एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आम्ही सर्वजण एका कुटुंबासारखे गुण्यागोविंदाने राहू, अशी शपथ गिरोबा चरणी घेतली आहे.
- रामचंद्र चव्हाण, सरपंच
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

अप्सरा बनली मंजुळा ! सालबर्डी सिनेमात सोनालीचा दिलखेचक अंदाज आणि भन्नाट डान्स

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

SCROLL FOR NEXT