कोकण

''सिंधू सरस''च्या स्पर्धांमध्ये इन्सुली तिरंगा संघाचे यश

CD

swt2612.jpg
33443
कुडाळ : ''सिंधू सरस २०२६'' प्रदर्शनात यश संपादन केलेल्या तिरंगा प्रभाग संघाच्या महिला आणि मान्यवर.

‘सिंधू सरस’च्या स्पर्धांमध्ये
इन्सुली तिरंगा संघाचे यश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : जिल्ह्यात झालेल्या जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ प्रदर्शनात तालुक्यातील इन्सुली येथील तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी विविध स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले.
या महिलांच्या यशामुळे सावंतवाडी तालुक्याचा नावलौकिक वाढला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘सिंधू सरस’च्या माध्यमातून महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये इन्सुलीच्या तिरंगा प्रभाग संघाच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग घेत आपले वर्चस्व सिद्ध केले. ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत ग्रामसखी दिव्या देसाई (डेगवे) यांनी चुरशीच्या लढतीत बाजी मारत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले. पाककला स्पर्धेत आपल्या हातातील चवीची जादू दाखवत रोणापाल येथील एलआरपी नमिता शेगडे यांनी प्रथम क्रमांक मिळवून कसब सिद्ध केले.
यासोबतच, सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत झालेल्या समूह नृत्य स्पर्धेत इन्सुलीच्या श्री देवी माऊली कला मंडळाने द्वितीय क्रमांक पटकावला. तिरंगा प्रभाग संघाच्या महिलांनी मिळवलेले हे यश केवळ त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचे नसून, ग्रामीण भागातील महिलांमधील संघटनशक्ती आणि आत्मविश्वासाचे उत्तम प्रतीक मानले जात आहे. या यशस्वी महिलांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT