swt2617.jpg
33477
मळेवाड ः येथे गॅस सिलिंडरसाठी झालेली गर्दी.
गॅस सिलेंडरसाठी
मळेवाडमध्ये रांगा
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २६ ः मळेवाड येथे गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आल्या. सद्यस्थितीत घरगुती गॅस, व्यावसायिक गॅसची सगळीकडे टंचाई सुरू असून, ग्राहकांना तसेच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. गॅस सिलेंडर मिळणे सध्या जिकरीचे झाले आहे. गॅस टंचाईचे मोठे संकट निर्माण झाल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी हॉटेल बंद पडली आहेत. आज मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत येथे संबंधित गॅस सिलेंडरची गाडी येणार म्हणून सुमारे दीडशेहून अधिक ग्राहकांनी सकाळपासूनच गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्या होत्या.
..............
swt2618.jpg
33480
डॉ. रमाकांत गावडे
डॉ. रमाकांत गावडे यांना
आंबेडकर पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २६ : येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रमाकांत गावडे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक व सांस्कृतिक कार्याबद्दल मानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. व्हिएतनाम येथे पार पडलेल्या एका समारंभात हा सन्मान त्यांना देण्यात आला. डॉ. गावडे यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच समाजसेवा, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित हा पुरस्कार समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. डॉ. गावडे यांचे कार्य या विचारसरणीशी सुसंगत असल्यानेच त्यांची या जागतिक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.