कोकण

गरवारे कॉलेज, आसमंततर्फे लँडस्केप इकॉलॉजी कार्यशाळा

CD

गरवारे कॉलेज, आसमंततर्फे
लँडस्केप इकॉलॉजी कार्यशाळा
रत्नागिरी : आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आणि पुण्यातील आबासाहेब गरवारे कॉलेज येथील जैवविविधता विभागाच्यावतीने तीन दिवसीय ‘लँडस्केप इकॉलॉजी’ कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ही कार्यशाळा २७ ते २९ मार्चदरम्यान महाविद्यालयात होणार आहे. या कार्यशाळेत चर्चासत्रे, प्रत्यक्ष क्षेत्रभेट, निरीक्षणाधारित अध्ययन आणि समूह विश्लेषण यांचा समावेश असून, सहभागी विद्यार्थ्यांना लँडस्केप इकॉलॉजी विषयाची सखोल समज मिळणार आहे. तसेच जमीनवापराचे नमुने समजून घेणे, संवर्धन नियोजन आणि जीआयएस व रिमोट सेन्सिंगसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे. या कार्यशाळेत डॉ. मंदार दातार, मृणालिनी वानरसे आणि स्मिता तावरे हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या संयोजक म्हणून डॉ. सोनाली शिंदे (विभागप्रमुख) तर समन्वयक म्हणून सलोनी बागडे कार्यरत आहेत.

------
जि. प. पदाधिकाऱ्यांचा
कर्मचारी संघटनेतर्फे सत्कार
संगमेश्वर ः रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, महिला बालकल्याण सभापती मयुरी शिर्के, समाजकल्याण सभापती ॲड. सुयोग कांबळे, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर आदी मान्यवरांचा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना जिल्हा शाखा रत्नागिरीच्यावतीने यथोचित सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद येथे रूजू झालेल्या नाईक यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी अध्यक्ष बबन बांडागळे, सरचिटणीस विलास सकपाळ, कार्याध्यक्ष भरणकर, उपाध्यक्ष अनंत शिंदे, श्रीकृष्ण जागुष्टे, अशोक भालेकर, विनायक हातखंबकर, दामुष्टे, नरोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

------

टेरव येथे २ एप्रिल रोजी
वार्षिक जत्रोत्सव
चिपळूण ः तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकिक आहे. महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो. यंदा हा उत्सव २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजवण्यात आले आहे. येथील रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट सतीश राव यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली अमित पारकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT