कोकण

इंधन टंचाईच्या अफवांना उधाण

CD

swt2615.jpg
33465
सावंतवाडी ः येथील पेट्रोल पंपावर लागलेल्या रांगा.

इंधन टंचाईच्या अफवांना उधाण
पेट्रोलसाठी झुंबड : पंपावर रांगाच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होईल, या भीतीने येथील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. ग्रामीण भागातील काही पंपांवर इंधनाचा पुरवठा होण्यास विलंब झाल्याने तुटवड्याची अफवा पसरली. परिणामी, शहरातील पेट्रोल पंपांवर कडक उन्हातही वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
आखाती देशांतील तणावामुळे इंधन टंचाई भासणार, अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. ग्रामीण भागातील पंपांवर इंधन पोहोचण्यामध्ये काहीसा खंड पडल्याने ‘पेट्रोल संपले आहे’ अशा अफवांना उधाण आले. याचा थेट परिणाम शहरातील पेट्रोल पंपांवर दिसून येत असून, गेल्या दोन दिवसांपासून ही गर्दी कायम आहे. आज सकाळपासूनच वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या; मात्र, ‘‘पंपावर मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही,’’ असे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. अनेक वाहनधारक भविष्यातील अडचण टाळण्यासाठी आपल्या वाहनांच्या टाक्या ‘फुल्ल’ करून घेताना दिसत आहेत.

चौकट
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
दुसरीकडे, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अनावश्यक गर्दी टाळून केवळ गरजेनुसारच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Speech: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

Malegaon Crime : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; तरुणाच्या वडिलांकडूनही विनयभंग, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT