कोकण

''तिरुमला'' परिसरात मगरीचा थरार

CD

चिपळूण परिसरात मगरीचा थरार
वनविभागाकडून सुटका ; मदत पथकाकडून तत्परता
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : शहरातील मार्कंडी येथील तिरूमला या गजबजलेल्या लोकवस्तीमध्ये अचानक एक मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती; मात्र, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत तत्परता दाखवत या मगरीला सुरक्षितपणे जेरबंद केले. मगरीला पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आल्याने परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
मार्कंडी परिसरातील रहिवासी संदेश शेलार यांच्या निदर्शनास ही मगर आली. त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने वनविभागाला पाचारण केले. माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम आधुनिक साधनसामग्रीसह घटनास्थळी दाखल झाली. मानवीवस्तीत शिरलेल्या या मगरीला पकडणे आव्हानात्मक होते; मात्र टीमने अत्यंत कौशल्याने तिला पिंजऱ्यात जेरबंद केले.
मगरीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिची प्रकृती उत्तम असल्याची खात्री वनविभागाच्या पथकाने केली. त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार, मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी मगरीला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. हे बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई पाटील, साहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाले. मोहिमेत वनपाल सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, शिवराज शिर्के, अजय बडदे आणि सुरेंद्र भोंडवे यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT