कोकण

दिव्यांग प्रमाणपत्रप्रश्‍नी सोमवारी मेळावा

CD

दिव्यांग प्रमाणपत्रप्रश्‍नी
सोमवारी मेळावा
रत्नागिरी ः दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत सोमवारी (ता. ३०) सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपस्थित राहणार आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत ज्या काही समस्या असतील त्या मांडण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी दिव्यांगांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. प्रमाणपत्र देण्यातील त्रुटी, दिव्यांग टक्केवारी ठरवण्यातील समस्या, दिव्यांग प्रमाणपत्राबाबत प्रलंबितता शिवाय ते मिळवताना येणाऱ्या अडचणीा अशा विविध समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत प्रयत्न करणार आहेत. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये हेदेखील उपस्थित राहणार आहेत.


रत्नागिरीत दोनपासून
नमन महोत्सव
रत्नागिरी ः कोकण सन्मान सामाजिक संस्था रत्नागिरीतर्फे २ ते ४ एप्रिलला सायंकाळी सात ते दहा वेळात येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात जिल्हास्तरीय नमन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्‌घाटन आमदार किरण सामंत व उद्योजक रवींद्र तथा अण्णा सामंत, सामाजिक कार्यकर्ता अपूर्वा सामंत यांच्या हस्ते होणार आहे. पारितोषिक वितरण उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. नमन मंडळांना अनुक्रमे ६० हजार व चषक, ५० हजार व चषक व ४० हजार व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट स्त्रीपात्र, मृदुंगवाद्य, अभिनय, विनोदी अभिनय, गायन, बालकलाकार, रंगभूषा, वेशभूषा, दिग्दर्शन अशी वैयक्तिक सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तालुक्यातील नमन मंडळांना प्रवासभाडे ३ हजार व तालुक्याबाहेरील नमनाला ५ हजार प्रवासभाडे देण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, पंचायत समिती सदस्या कांचन नागवेकर, कुणबी समाज उन्नती संघाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र गराटे, कुणबी समाजाचे ज्येष्ठ नेते सुरेश भायजे, शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, महेंद्र झापडेकर, नूतन सभापती प्रवीण पांचाळ-नरबे, कोकण नमन कलामंचचे अध्यक्ष कांबळे, शांताराम मालप आदी उपस्थित रहाणार आहेत. जिल्ह्यातील नमन मंडळांनी नमन महोत्सवाला सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT