कोकण

तालुक्यात २ एप्रिलपासून चैतावली उत्सव

CD

चिपळुणात गुरुवारपासून चैतावली उत्सव
पालख्यांचे स्नेहमिलन ; हजारो भाविकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः कोकणातील शिमगोत्सवाचा आनंद ओसरल्यानंतर आता चिपळूणसह ग्रामीण भागातील भाविकांना वेध लागले आहेत ते ग्रामदेवतांच्या ‘चैतावली’ उत्सवाचे. सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या या उत्सवाचा प्रारंभ २ एप्रिलपासून होत असून, तालुक्यात ढोलताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात हा सोहळा रंगणार आहे. चैतावली उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून, तो कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सोहळा आहे. या उत्सवात ग्रामदेवतांच्या पालख्या एकमेकांच्या भेटीला जातात. रात्रीच्यावेळी होणारा पालख्यांचा हा नेत्रदीपक भेटीचा सोहळा, आकर्षक विद्युत रोषणाई, पालख्या नाचवणे आणि ढोलवाद्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होते. २ एप्रिलला हनुमान जयंतीचा उत्सव पोसरे आणि कापसाळ येथे होणार आहे. कोंढे येथे ३ला, ४ला रेहळे आणि रामपूर चव्हाणवाडीत, ५ला दोनवली आणि मिरजोळी येथे, ६ला भोम गावात, ७ला मजरेकौंढर नवरतवाडी आणि पाचाड येथे, ९ला वैजी येथे, १०ला कात्रोळी देऊळवाडीत, १२ला कात्रोळी लायकवाडी, शिरळला १३ला तर रामपूर केदारनाथ तळ्याचीवाडी येथे १४ एप्रिलला उत्सव होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

Fact Check: वैभव सूर्यवंशीने Laila Faisal ची रिल केली रिपोस्ट; अभिषेक शर्माच्या कथित गर्लफ्रेंडला फॉलो करतोय पठ्ठ्या

Khambatki Ghat Landslide : पुणे–सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ दरड कोसळली; काही काळ वाहतूक विस्कळीत, सहाव्या वळणावर नेमकं काय घडलं?

Yogini Ekadashi 2026: आषाढ महिन्यातील पहिली एकादशी ! जाणून घ्या अचूक तारीख आणि व्रताचे नियम

Latest Marathi News Live Update : मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी 2 दिवस रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT