Ram Raksha Andolan: राम मंदिर देणगीप्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार! महाराष्ट्रातून 'राम रक्षा आंदोलना'ची घोषणा; कुठून सुरूवात होणार?

Uddhav Thackeray Ram Raksha Andolan: उद्धव ठाकरे यांनी ५ जुलै रोजी दादरमध्ये राम रक्षा आंदोलनाचे आवाहन केले आहे. दादरमध्ये होणाऱ्या या आंदोलनात ते स्वतः सहभागी होणार आहेत.
Uddhav Thackeray Ram Raksha Andolan

Uddhav Thackeray Ram Raksha Andolan

ESakal

Updated on

अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरीविरोधात उद्धव ठाकरे यांनी आता रणशिंग फुंकलं आहे. मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत आणि हिंदुत्वाच्या नावाखाली होणारी लूट सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत म्हटले की, आज संपूर्ण देश भाजपच्या राजवटीखाली आहे. राम मंदिर आंदोलनात अनेक लोकांनी सहभाग घेतला होता आणि मंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंनी खूप काही सहन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com