कोकण

जामसंडे येथे उद्या सकल हिंदू संमेलनाचे

CD

जामसंडे येथे उद्या
सकल हिंदू संमेलन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त नियोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून रविवारी (ता.२९) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात हिंदूंनी सहभागी होण्याचे आवाहन संघाचे देवगड तालुका कार्यवाह महेश कानेटकर आणि सकल हिंदू समाज समिती संयोजक विलास रुमडे यांनी संयुक्तपणे केले.
कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत जामसंडे येथील टिळक स्मारकमध्ये माध्यमांना माहिती देण्यात आली. श्री. कानेटकर म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून सकल हिंदू संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून शुभम पाटकर (तळेबाजार) उपस्थित राहणार असून प्रमुख वक्ते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. तत्पूर्वी शोभायात्रेचे आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज देवगड व मोंड मंडल यांच्या वतीने करण्यात आहे. हिंदू धर्म परंपरा, संस्कृती आणि मुल्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET परिक्षार्थींना मोठा दिलासा! परीक्षा पुन्हा होणार; विद्यार्थ्यांना सरकारकडून फी माफ

५ लाखात नीटचा पेपर, ४२ तास आधी हातात! केरळमध्ये फुटला, राजस्थानपर्यंत पोहोचला; ७२० पैकी ६०० गुणांचे प्रश्न जसेच्या तसे

थिएटरनंतर आता ओटीटीवर गाजणार 'अभंग तुकाराम'! या दिवशी होणार ओटीटीवर रिलीज; कुठे पाहाल?

Kalamb ACB Raid: स्पा सेंटरसाठी ‘हप्ता’ मागणारा पोलिस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; ३६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला, कळंबमध्ये मोठी कारवाई!

प्रिया 'ठरलं तर मग'चा निरोप घेणार? कोण साकारणार नवी खलनायिका? अभिनेत्रीने स्वतः केला खुलासा, म्हणाली, हो...

SCROLL FOR NEXT