जामसंडेत आज
कृषी महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः राज्य शासन कृषी विभागाच्या वतीने उद्या (ता. २८) सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत जामसंडे येथील सांस्कृतिक भवनमध्ये कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये कृषी प्रदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि चर्चासत्राचे आयोजन केले आहे. पालकमंत्री नीतेश राणे याचे उद्घाटक आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ठाणे विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. वैभव शिंदे (मसाला पीक व्यवस्थापन), रत्नागिरी पणन महामंडळाचे सहायक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी (मँगोनेट व निर्यात), सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे (आंबा पुनरुज्जीवन), संदीप चोरगे (स्थानिक वाण संवर्धन), प्रगतिशील शेतकरी नयन चेंदवणकर (मधुमक्षिका पालन) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकमाला उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी आरती पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.