

PBKS vs RCB | IPL 2026
Sakal
IPL 2026, PBKS vs RCB Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१७ मे) दोन सामने होणार असून पहिला सामना धरमशाला येथे पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना होत आहे. हा हंगामातील ६१ वा सामना असून दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.
हा सामना जिंकून बंगळुरू संघ प्लेऑफमधील जागा निश्चित करण्याची संधी आहे, तर स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी पंजाबला विजयाची आवश्यकता आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात विजयासाठी मोठे प्रयत्न करताना दिसतील.