-rat२७p१.jpg-
P२६O३३६६८
रत्नागिरी ः खल्वायन आयोजित रियाज मंत्र या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी व मार्गदर्शिका विदुषी भाग्यश्री देशपांडे.
----------
शास्त्रीय गायनासाठी रियाज कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : शास्त्रीय गायनासाठी योग्य आणि प्रभावी रियाज कसा करावा, यासाठी खल्वायन रत्नागिरी या संस्थेतर्फे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडने प्रायोजित केलेली ही कार्यशाळा भगवान परशुराम सभागृहात झाली.
मुंबईच्या प्रसिद्ध गायिका व गुरू विदुषी भाग्यश्री देशपांडे (संगीत अलंकार, एमए (म्युझिक) यांनी या कार्यशाळेत आवाज चांगला होण्यासाठी काय करावे?, स्वर रियाज आणि अलंकार कसे म्हणावेत, श्वासोच्छ्वासावर नियंत्रण कसे मिळवावे?, शास्त्रीय गायन, चित्रपटासाठी, भजनातील, नाट्यसंगीत गायन यासाठी वेगवेगळा रियाज कसा करावा, आवाजातील दोष कसे घालवावेत आणि दररोज रियाज कधी करावा आदींबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यशाळेत रत्नागिरी व आजूबाजूचा परिसर तसेच संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, राजापूर व गोवा येथील ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.